रामरक्षा – वज्रपंजरकवच

दैनिक सकाळच्या दिनांक १२ एप्रिलच्या (२०२१) आवृत्तीत सौ. मोहना चितळे यांनी लिहिलेला एक सुंदर लेख वाचनात आला.

लिंक: इथे

अप्रतिम लेख आहे.

आजपासून लॉकडाऊन सुरु झाला. करोनाचं संकट लवकर दूर होवो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.

१५ एप्रिल पर्यंत बाहेर पडू नका…

माननीय पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात अजून  तीन आठवड्यांनी संपूर्ण देशभरात लॉक डाउन ची मुदत वाढवीत असल्याबद्दल सांगितलं होतं म्हणजे दिनांक १५ एप्रिल पर्यन्त नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा त्याचा अर्थ आहे.

आज दिनांक ३१ मार्च २०२०. अजूनही पुण्यातल्या रस्त्यांवर लोकं  दुचाक्या आणि चारचाक्या  हिंडताना दिसत आहेत. फक्त पुणेच नाही तर देशभरातील मोठ्या आणि छोट्या शहरांत / गावांत हेच चित्र दिसत आहे. आता शिक्षित आणि समजूतदार लोकांनीसुद्धा शक्यतो सर्व वेळ घरातच बसणे (थांबून राहणे) सर्वथैव योग्य आहे. तरच ह्या साथीच्या रोगाला आळा बसू शकेल. बघू नागरिक कसे वागतात ते!    (कोथरूड मधील एक बाधित व्यक्ती स्वर्गवासी झाल्याचं सौ. मेधा कुलकर्णी यांच्या चित्रफितीतून आज  समजलं …..  अवघड आहे…)

 

सिनेगीते

लहानपणी चित्रपट बघून थिएटरच्या बाहेर आलो की न चुकता त्या त्या सिनेमातील गाण्यांच्या पद्यावल्या विकणारी माणसं हटकून दिसायचीच. चित्रपटातील नायिकेचा फोटो वगैरे बहुधा त्यावर छापलेला असायचा. आधीआधी खूप कुतूहल होतं ह्या प्रकाराबद्दल परंतु नंतरनंतर त्या पद्यावल्या आणि त्यांचे विक्रेते कमी होऊ लागले आणि माझं चित्रपट पाहणंसुद्धा.

परवा ग्रंथालयात गेलो असताना तिथे एक पुस्तक दिसलं. तसं ते ह्यापूर्वी अनेकदा पाहिलेलं होतं, पण यावेळेस ठरवून तेच आणलं. माझ्या सर्वात आवडत्या गायकाची गाणी त्यात आहेत – दिल्लीच्या एका प्रकाशकाने छापलेली किशोर कुमार यांची गाणी !!

hit-filmi-geet-kishor

पुस्तकाच्या सुरुवातीला हिंदी भाषेत किशोर कुमार यांच्याबद्दल संक्षिप्त स्वरूपातील माहिती आहे, तथापि एकंदरीत पुस्तकाचा हेतू किशोर कुमार यांनी गायलेल्या गीताचे बोल प्रकाशित करणे इतकाच आहे. अर्थातच ह्यात त्यांनी गायलेली सर्वच गाणी दिलेली नाहीत, ती देणेही शक्य नाही. सुदैवाने माझ्या आवडत्या गाण्यांपैकी बरीचशी ह्यात आहेत. उदा:

manmauji

ह्या गाण्याशी निगडीत अशी माझी एक आठवण आहे. महाविद्यालयातील शेवटच्या वर्षी एक-दोन मास्तर आणि आम्ही काही विद्यार्थी-विद्यार्थिनी बेंगळूरूला अभ्यास-सहलीसाठी गेलो होतो. एका मित्राने (सुहास) त्याचा टेप-रेकॉर्डर आणला होता, आणि इतर काही सुश्राव्य हिंदी गाण्यांमध्ये हे एक होतं – आणि ते त्यावेळी आम्हाला खूपच आवडलं होतं. सुहास सतत ते वाजवायचा त्यामुळे ते ध्यानातही राहिलं आहे! Needless to say that I love this song!!

बाकी, किशोर कुमार यांच्याबद्दल मी बापडा काय लिहिणार – त्यांच्या आवाजातील गाणी ऐकणं ही माझ्या दृष्टीने सुखाची परमावधी असते. काय तो सुंदर आवाज !! कवीने लिहिलेल्या त्या शब्दांमधील सर्व भावना त्याच तीव्रतेने / हळुवारपणे गाणे आणि ते शब्द संगीतासोबत श्रोत्यांच्या मनाच्या तळापर्यंत जाऊन पोहोचविणे ही साधी-सोप्पी गोष्ट नव्हे. परंतु किशोर कुमार यांनी गायलेली गाणी ही जादू प्रत्येक वेळेस करतात. निदान माझ्या तरी आयुष्यात असे क्षणच आले नाहीत की जेंव्हा त्यांनी गायलेली गाणी ऐकली आणि अंगावर रोमांच उभे राहिले नाहीत. आनंदी, प्रसन्नतेचे अनुभव देणारी गाणी त्यांनी जितक्या सहजपणे गायली तितक्याच परिणामकारक रीतीने अतिशय गंभीर मूडमधील गाणीही त्यांनी गायली. त्यांनी गायलेली काहीकाही गाणी ऐकताना तर हटकून डोळ्यांत अश्रू येतातच. काय जबरदस्त शक्ती आहे त्यांच्या आवाजात. टेरिफिक !! सॉलीड !!! I’m forever indebted to this greatest singer of all!! A really respectful figure!! Hats off, sire!!

 

The Legends!! Kishore-da and Rafi!!

Read this lovely article on FB today.

Link: here

Rafi-and-Kishore-da

——

Rafi-Kishore rivalry a myth!

Mohammed Rafi heard Kishore Kumar rendering “Meri Neendon Mein Tum” with Shamshad Begum in ‘Naya Andaz’ in the middle 50s and was moved to tears.

He highly complimented his beloved Kishoreda for such a haunting number. Kishore Kumar openly confessed he could have never sang “Na Kisi Ki Aankh Ka Noor Hoon” like Rafi did in ‘Lal Quila’.

For years, the media without knowing inner details projected Mohammed Rafi and Kishore Kumar as arch rivals. Competitors they were but never rivals. In fact, when Mohammed Rafi sang “Man Mora Bawra” and “Ajeeb Dastan Hai Yeh Meri” for Kishore Kumar, the multi-dimensional Kumar could not and did not protest. Though he was the hero in both Ragini and Shararat, Rafi sang for Kishore under the baton of O.P Nayyar and Shanker Jaikishan, very effectively creating musical history.
(This picture was taken when Kishore Kumar visited Rafi at his son’s Khalid’s place in London)made between the two singing the same number as Kishore’s one was pathos oriented and Rafi’s romantic.

During their relatively short life, the two friends were associated in almost 59 songs approximately of which, 33 songs have been recorded as duets and the balance 26 songs can be categorized as multiple voiced songs comprising of 2 or more singers. Rafi Sahab started his career in the year 1944 with the Punjabi film “Gulbaloch” whereas Kishore Da started his career in the year 1948 with the film “Ziddi” with the song “Marne ki duwayein kyoon mangoo” picturised on Dev Anand with music scored by Khemchand Prakash.

In the 70s, both sang “Woh Din Ke Baat” in Jangal Mein Mangal and Yadon Ki Baraat each composed by Shanker Jaikishan and R.D. Burman. As Kishore Kumar set the nation literally dancing to his Zindagi Ek Safar in Andaz, Rafi proved a perfect foil for him with the sad antara of the same song, Hanste Gaate. Madan Mohan composed the unique “Yun Na Sharma phailade” with Kishore Kumar at his romantic best and Mohammed Rafi rendering the tragic portion, Are Hansne Wale.

The 70s had Kishore Kumar ruling the roost with the maximum number of hits tuned by S.D. Burman, R.D. Burman, Laxmikant Pyarelal and Kalyanji Anandji. Yet, Rafi held his own with his inimitable Tum Jo Mil Gaye Ho, Teri Bindiya Re with Lata Mangeshkar and undoubtedly Aye Mere Man though his tonal quality had received a back seat due to a throat infection.

R.D. Burman, who was mainly instrumental in creating the Kishore Kumar wave, had to lean on Mohammed Rafi for his super hits Chand Mera Dil, Kya Hua Tera Wada and Yamma Yamma. These songs signaled Rafi’s glorious comeback in the late 70s after a brief lull earlier. Even later composers like Rajesh Roshan and Bappi Lahiri could think of no one else except for Rafi to render, Dil Ki Kali, Are Re Re Aisa Tarana and Saathi Re Gam Nahin Karna. Kishore was always with them but some songs could never be thought of without the inimitable Mohammed Rafi.

The blank face of a heartbroken Kishore Kumar prior to Mohammed Rafi’s funeral explained Kishore’s innermost feelings for his more illustrious senior, who was much more to him than a rival or competitor. No wonder Kishore Kumar paid his richest tribute to Mohammed Rafi with his Bengali haunting number, “she jeno amar pashe ajo boshe” after his favourite singer’s death. No one knew better than Kishore Kumar that Mohammed Rafi had a range and versatility which he never possessed himself.

Courtesy: Shri.Ranjan Das Gupta @timesofindia.indiatimes.com.

(This picture was taken when Kishore Kumar visited Mohammed Rafi at his son’s Khalid’s place in London. Image courtesy: Yasmin Rafi through www.firstpost.com)

These days…

Open a(ny) newspaper, browse through the TV channels, visit FB… do whatever to know what’s happening around – everything is filled with unpleasant news and very disgusting, lowly language. The newscasters, anchors, reporters are very good people – in person – as individuals, but when it comes to present anything to the public, they only focus on cheap publicity. Why? Why?? Many of the educated people have already stopped watching the so-called “discussions” and “talk-shows” on these 2-bit useless channels. I’m one of them too!!! So, these days I am feeling very happy (!!) because I get more time to read books which is my passion!!

मित्रवर्य !!

|| श्रीराम ||

आमच्या मित्रवर्यांचा आज दिनांक २९ जानेवारी २०१३ रोजी पन्नासावा वाढदिवस! आम्ही मित्र अत्यानंदाने तो साजरा करण्यास उत्सुक आहोत! पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि यानिमित्ताने आमच्या ह्या सुहृदाबद्दल काही शब्द लिहू पाहतो.

ह्या आमच्या मित्राला लोकांचं प्रेम खूप – लोकसंपर्क प्रचंड – अवाढव्य म्हणावा असा! आयुष्यातल्या प्रत्येक बदलत्या टप्यांवर सामाजिक संकेतांच्या ओझ्याला महत्त्व देण्यापेक्षा त्या बदलांशी जुळवून घेत मित्रांनाही सफाईने परंतु अनौपचारिक मार्गदर्शन करीत आलेला हा आमचा मित्र स्वभावाने अत्यंत निगर्वी आणि मृदू आहे. त्याचे वय, शिक्षण, अनुभव, परिपक्वपणा आणि मनाचा मोठेपणा ह्या सर्व बाजू बघता तो कुणाशीही चटकन मैत्री करू शकतो ही गोष्टच फार सुंदर आहे. प्रवृत्तीने मुळातच सात्विक असलेल्या ह्या माणसाशी मैत्री करताना कोणालाही कधीही औपचारिकपणाच्या कठीण पायऱ्यांवरून कधी जावं लागलं असेल असं वाटत नाही! मित्रांच्या स्वभावातील उणीवा किंवा मित्रांकडून घडणाऱ्या चुका लक्षात आल्या तरी तो कधीही बोचरेपणाने टीका करताना दिसत नाही. एखाद्याच्या पाठीमागे उगीचच टीका करणे किंवा टोमणे मारणे हे त्याच्या स्वभावातच नाही. त्याच्या बाबतीत अजून एक खूप छान अशी गोष्ट मला कायम जाणवत आली आहे ती अशी की आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर तो अत्यंत संयतपणे आणि शांतपणे आणि अत्यंत चिकाटीने स्वतःचंच परफॉर्मन्स अप्रेझल करतो आणि स्वतःच्या आयुष्यात ज्या मूल्यांची आणि तत्त्वज्ञानाची कास धरली त्याच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या विचारांची मिमांसा करतो

विशेषतः ऑफिसातील तरुण तुर्कांकडून केल्या जाणाऱ्या दैनंदिन कामाचा वेग वाढविण्याबरोबरच महत्त्वाच्या प्रकल्प-कामासाठी योग्य व्यक्ती कशा निवडाव्या, आणि त्यांच्याकडून ठरलेल्या वेळेत उत्तम प्रतीच्या कामासाठी लागणारा योग्य असा प्रतिसाद कसा मिळवायचा याच्या कल्पक योजना त्याच्याकडे नेहमी तयार असतात. नोकरी करीत असताना तो नेहमीच सहकर्मचाऱ्यांना कायम प्रोत्साहित करून, त्यांना वेळप्रसंगी दिलासा देत असताना आढळायचा. योग्य ठिकाणी पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांना आपलेसे करणे, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांना आणि कौशल्याला चांगली संधी देणारे असे हे साहेब होते. दैनंदिन जीवनातल्या कोणत्याही बाबी असोत, वैयक्तिक किंवा इतर, अत्यंत शिस्तबद्ध दिनक्रमामुळे कामाचा वेग राखून सर्व मनोकामना पूर्ण केल्यामुळे होणारा आनंद कोणापासूनही न लपविता हे सर सर्वांबरोबर शेअर करीत असतात. घरामध्येसुद्धा सर्व आवश्यक ती कर्तव्ये प्रेमाने आणि आनंदाने पार पाडत असताना कुटुंबियांना सतत चिअर-अप करून त्यांच्याही सर्वांगीण प्रगतीकडे लक्ष पुरविणारा हा मित्र भरपूर जीवनशक्ती घेऊनच जन्माला आला आहे ! आमचा हा मित्र स्वतःच्या विचारांवर अत्यंत ठाम राहून, स्वकर्तृत्वावर स्पष्ट विश्वास बाळगून असल्याने अत्यंत समाधानी आणि तृप्त असे आयुष्य रसिकतेने जगत आला आहे.

काळाच्या वेगासोबत स्वतःचं आयुष्य नीट “अॅडजस्ट” करीत असताना, झपाट्याने बदलणारी सामाजिक आणि व्यक्तिगत  परिस्थिती बहुतकरुन सर्वच लोकांच्या ठायी थोडा-फार ताण-तणाव निर्माण करीत असते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात काही अवघड क्षण येऊ शकतात, परंतु आमच्या या सुधारणावादी आणि “सुपर-पॉझिटीव्ह थिंकर” मित्राने सदैव जागरूक राहण्याबरोबरच स्वतःला नेहमीच अत्यंत संतुलित व सुयोग्य अशा मार्गावर ठेवल्यामुळे तो नेहमीच खरोखरीचा “समाधानी” दिसतो. असा खराखुरा “प्रौढ” (सर्वस्वी आणि फक्त चांगल्या अर्थानेच!) मित्र मला लाभला त्याबद्दल मी माझ्या नशिबाचे आभार मानतो.

उत्तमोत्तम चरित्रांचे सतत वाचन, चिंतन व मनन आणि व्यवसायानिमित्त होणाऱ्या नवनवीन संपर्कातून मिळणारे मित्र आणि त्यांच्याबरोबर होणारा सुसंवाद व नवनवीन कल्पनांचे आदान-प्रदान ह्यांतून स्वतःसाठी एका विलक्षण “व्हिजन” चे सृजन करून त्याला सकारात्मक कृतीची जोड देऊन अत्यंत समृद्धपणे अतिशय शांत, विवेकवादी, प्रसन्न असं आयुष्य जगणारा आमच्या ह्या रसिक मित्राला त्याच्या पन्नाशीनिमित्त अनेक उत्तम शुभेच्छा !

||  देव करो कृपा थोर, येवो दिन हा वारंवार ||